शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक अजब प्रकार समोर आलेला असून इंजिनिअरिंग आर्किटेक परीक्षेला डमी म्हणून बसण्यास नकार दिल्याने घरात शिरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार कोंढवा येथे समोर आलेला आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , साहिल राजेंद्र देऊळकर ( वय 19 वर्ष राहणार गौरव सोसायटी कोंढवा ) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून फिर्यादी तरुण आणि साहिल हे एकमेकांचे मित्र आहेत . साहिल याची 12 जानेवारी रोजी सिंहगड अकॅडमी येथे इंजिनिअरिंग ग्राफिक्स परीक्षा होती त्या परीक्षेला त्याने स्वतःच्या जागेवर डमी उमेदवार म्हणून मित्राला बसण्यासाठी सांगितले मात्र मित्राने नकार दिला म्हणून साहिलने त्याच्या घरात घुसून त्याला पट्ट्याने बेदम मारहाण केली असे फिर्यादी तरुणाचे म्हणणे आहे.