पुणे शहरात अनेक ठिकाणी आडोश्याला असलेल्या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची प्रकरणे समोर येत असून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे . विमान नगर भागात असाच एक प्रकार उघडकीस आलेला असून एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने 16 तारखेला कारवाई केली . धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी राजस्थानमधील एक अभिनेत्री आणि उझबेकिस्तान येथील दोन तरुणी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले दलाल हे परराज्यातील असून ऑनलाईन पद्धतीने त्यांचा वेश्या व्यवसाय सुरू होता . इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी आणि रोहित अशी या दलालांची नावे असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायदा अंतर्गत त्यांच्यावर विमान नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . आरोपी इरफान आणि रोहित हे परराज्यातील असून ऑनलाईन पद्धतीने त्यांचा हा काळधंदा सुरू होता अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे यांनी दिलेली आहे.