पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रग्स तस्कर ललित पाटील आणि त्याला पळून जाण्यासाठी मदत करणारा सचिन वाघ या दोघांवर पोलिसांनी तब्बल २६०० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बिराजदार यांच्या न्यायालयात दाखल केलेले आहे.
सदर गुन्ह्यात आतापर्यंत सहा जणांवर 2200 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले असून नव्या आरोप पत्रामुळे एकूण 4800 पानांचे एकूण आरोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे.
ललित पाटील याच्या दोन्ही मैत्रिणी अर्चना किरण निकम ( वय 33 ) आणि एडवोकेट प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित माहिरे ( वय 39 दोघीही नाशिक ) , ललितचा भाऊ भूषण पाटील ( वय 34 ), साथीदार अभिषेक बलकवडे ( सर्वजण राहणार नाशिक ) आणि विजय अराना ( वय 50 राहणार कॅम्प ), त्याचा ड्रायव्हर दत्तात्रय डोके ( वय 40 राहणार हडपसर) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत
नव्याने दाखल करण्यात आलेले दोषारोपपत्र हे ललित पाटील आणि सचिन वाघ या दोघांवर दाखल करण्यात आलेले असून त्यात तब्बल 45 जणांचे जबाब आणि साक्षी नोंदविण्यात आलेले आहे .