गोव्याला सांगून अयोध्येला नेलं , बायकोचा घटस्फोटासाठी अर्ज

Spread the love

देशात एक चमत्कारिक असे प्रकरण समोर आलेले असून हनिमूनसाठी तुला गोव्याला घेऊन जाईल असे आश्वासन एका पत्नीला देण्यात आले मात्र प्रत्यक्षात पती तिला अयोध्येला घेऊन गेला म्हणून पत्नीने चक्क घटस्फोटाचा अर्ज केल्याचा प्रकार मध्यप्रदेशातील भोपाळ येथे समोर आलेला आहे. कौटुंबिक न्यायालयात या जोडप्याचे सध्या समुपदेशन करण्यात येत आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या दांपत्याचे लग्न झालेले होते.  पत्नीला पतीने हनिमूनसाठी तुला परदेशात घेऊन जाईल किंवा परदेशात शक्य झाले नाही तर गोव्याला घेऊन जाईल असे देखील सांगितले होते मात्र पतीचे वृद्ध आई-वडील यांनी मंदिरात जाण्याची इच्छा होती असा आग्रह धरला व पतिने त्यानंतर पत्नीला आपण गोव्याला जाऊ असे आश्वासन दिले मात्र प्रवासाच्या एक दिवस आधी त्याने आपण आईच्या इच्छेनुसार अयोध्येला चाललेलो आहे अशी माहिती दिली. 

एकीकडे पत्नीने सुरुवातीला परदेशात जाण्याची स्वप्न रंगवली त्यानंतर गोव्यापर्यंत प्रकरण आले. गोव्यापर्यंत जाण्यास देखील ती तयार झाली मात्र पती आपल्याला देवदर्शनाला घेऊन जात आहे त्यामुळे तिच्या सुखी स्वप्नांवर विरजण पडले आणि तिने अखेर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पतीने आपला विश्वास तोडलेला आहे असा आरोप तिने केलेला आहे. 


Spread the love