विश्रांतवाडीत महिला सापडली सायबर भामट्यांच्या जाळ्यात अन.. 

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार पुण्यात समोर आलेला असून ऑनलाईन टास्कच्या आमिषाने एका महिलेची सायबर चोरट्यांनी 12 लाख रुपयांची फसवणूक केलेली आहे . सोमवारी हा प्रकार उघडकीला आला असून तांत्रिक विश्लेषणाच्या आधाराने पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. 

पीडित महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली असून महिलेच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी घरातून ऑनलाईन पद्धतीने काम करा असा संदेश पाठवलेला होता. ऑनलाईन काम केल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवत चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. 

सुरुवातीला या सायबर भामट्यांनी महिलेला चांगला परतावा दिला म्हणून महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला आणि त्यानंतर त्यांनी ऑनलाईन पुढील काम मिळवण्यासाठी गुंतवणूक करावी लागेल असे सांगितले. अवघ्या काही दिवसात तुमची गुंतवणूक पूर्णपणे परत येईल असे देखील तिला आमिष दाखवले त्यानंतर या महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात 12 लाख 20 हजार 292 रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी मोबाईल क्रमांक देखील बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी तक्रार देण्यात आलेली आहे


Spread the love