महाराष्ट्रात किरकोळ कारणावरून कायदा हातात घेऊन दमदाटी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पिंपरीत समोर आलेला आहे . ‘ आत्ताचा हा ट्रेलर आहे नंतर पूर्ण पिक्चर दाखवतो ‘ असे म्हणत एका टोळक्याने अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करणाऱ्या एका तरुणावर कोयत्याने वार केलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , दिघी परिसरातील दत्तनगर चौपाटीवर 26 तारखेला रात्री सव्वा नऊच्या सुमारास हा प्रकार घडलेला असून गौरव बळीराम शेवाळे ( वय 30 वर्ष राहणार शास्त्री चौक आळंदी ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे . शुभम संदीप सोनवणे ( वय 23 वर्ष राहणार आदर्श नगर दिघी ) आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.