नवरा शारीरिक सुख देईना, कल्याणमध्ये महिला पोहोचली पोलिसात.. 

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून आपला पती शारीरिक सुख देण्यास असमर्थ आहे असा आरोप करत एका महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत नवऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. कल्याणजवळील खडकपाडा पोलीस ठाण्यात महिलेने धाव घेतली होती. 

उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार महिलेच्या पतीचे वय 40 वर्षे असून लग्नापूर्वीच तिच्या पतीला या प्रकाराची कल्पना होती मात्र त्याने लग्नापूर्वी ही माहिती आपल्यापासून दडवली आणि त्यानंतर आपल्या सोबत लग्न करत शारीरिक सुखापासून आपल्याला वंचित ठेवले असे तिने म्हटलेले आहे. 

तक्रारदार महिलेचे वय 32 वर्ष असून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका दुर्गम गावात ती कुटुंबीयांसोबत राहत होती . ओळखीतील एका व्यक्तीच्या माध्यमातून तिचे लग्न शहाड येथील एका चाळीस वर्षीय तरुणांसोबत मागील वर्षी जूनमध्ये झालेले आहे. लग्नासाठी 40 वर्षापर्यंत का थांबला असा प्रश्न विचारला त्यावेळी आपल्या पतीने सरकारी नोकरीच्या शोधात होतो म्हणून लग्नाला विलंब झालेला आहे असे कारण सांगितले. 

आपला नवरा केवळ शिकलेला आहे म्हणून आपण नाशिक जवळील इगतपुरी इथे त्याच्यासोबत लग्न केले मात्र नवरा विक्षिप्तपणे वागू लागला म्हणून आपण माहेरी निघून गेलो त्यानंतर पुन्हा सासरी आलो त्यावेळी तो काही औषधे खात असल्याचे लक्षात आले. ज्या डॉक्टरकडून ही औषधे आलेली होती त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याने आपला पती नपुंसक असल्याची माहिती दिली आहे असे महिलेचे म्हणणे आहे. खडकपाडा पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 


Spread the love