फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार पुण्यात समोर आलेला असून परदेशाचा व्हिसा बनवून देतो असे सांगत तब्बल 19 जणांचे पासपोर्ट कुरिअरने मागून घेतले आणि फक्त दहा जणांचा बनावट व्हिसा बनवून एका आर्किटेक व्यक्तीची फसवणूक करण्यात आलेली आहे.पुण्यातील वाकड परिसरातील कस्तुरी चौकाजवळ हा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मनीष कन्हैयालाल स्वामी ( वय 32 वर्ष राहणार राजस्थान ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून त्यांनी हिंजवडी पोलिसात धाव घेतली आहे . त्यांनी ब्ल्यूओसिन मरीन कंपनी ( भुमकर चौक वाकड ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
फिर्यादी व्यक्ती हे आर्किटेक्ट असून आरोपींनी मनीष यांचा विश्वास संपादन केला आणि स्वामी तसेच त्यांचे 19 मित्र यांना बाहेर देशात व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ब्रूनई देशात जाण्यासाठी बनावट व्हिसा बनवून त्यावर बनावट शिक्के देखील मारण्यात आले आणि स्वामी यांच्या व्हाट्सअप वर पाठवून त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केलेला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे या प्रकरणी तपास करत आहेत.