काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल , झालं असं की..

Spread the love

पुणे महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात सोमवारी 29 तारखेला चतुर्श्रुंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी फिर्याद दाखल केलेली होती

प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेकडून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आलेले होते . काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी पाण्याची टाकी बांधण्यासाठी पाठपुरावा केला मात्र त्याचे क्रेडिट भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचा आरोप करत धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसोबत तिथे धाव घेतलेली होती. 

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे , धंगेकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख निवडणूक जगताप यांना शिवीगाळ करत धमकावले . महापालिका अधिकाऱ्यांनी या प्रकाराचा निषेध केला त्यानंतर जगताप यांनी फिर्याद दिल्यानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना , मागील तीन वर्षांपासून सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याने जेव्हा कधी लोकशाहीवर हल्ला होतो. पत्रकार आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांचा हल्ला होतो तेव्हा मी पेटून उठतो . आशा नगर या ठिकाणी झालेली शिवीगाळ ही माझ्याकडून झालेली आहे मात्र मला त्याचा आनंदच आहे. माझी वाढती लोकप्रियता भाजपच्या डोळ्यात खूपत आहे आणि भाजपच्या दबावापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे , ‘ असे त्यांनी म्हटलेले आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी पालिकेची तिजोरी भाजपसाठी उघडी केलेली आहे , असे देखील ते पुढे म्हणाले. 


Spread the love