तब्बल 15 जणांना न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा , भाजप नेत्याला घरात घुसून.

Spread the love

संपूर्ण देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी केरळ न्यायालयाने पीएफआय संघटनेशी संबंधित अशा 15 जणांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे . डिसेंबर 21 मध्ये अलापुझा जिल्ह्यामध्ये भाजपच्या ओबीसी विंगचे नेते रणजीत श्रीनिवासन यांची घरात घुसून अत्यंत अमानुषपणे त्यांच्या कुटुंबीयांसह समोरच हत्या करण्यात आलेली होती. न्यायाधीशांनी निर्णय सुनावताना आरोपींनी ज्या पद्धतीने हत्या केलेली आहे ती पद्धत पाहता भविष्यात आरोपींकडून सुधारण्याची कुठलीच अपेक्षा करता येणार नाही असे देखील म्हटले आहे. 

भाजप नेते रणजीत श्रीनिवासन यांच्या हत्येत पीएफआय आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांचा हात होता. 19 डिसेंबर 2021 रोजी एकूण 15 आरोपींनी रणजीत यांना घरात घुसून बेदम मारहाण करत त्यांच्या कुटुंबीयांसमोरच त्यांच्या हत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करतेवेळी काही आरोपी घराबाहेर देखील रणजीत यांना पळून जाऊन जाता येऊ नये म्हणून घराबाहेर थांबलेले होते. 

20 जानेवारी रोजी न्यायालयाने सर्व 15 जणांना दोषी ठरवून 30 जानेवारीपर्यंत निकाल पुढे ढकलला होता. घटनेमध्ये 15 पैकी एकूण आठ आरोपी प्रकरणात थेट सहभागी होते असे देखील न्यायालयाच्या निदर्शनास आलेले होते. आरोपींनी अवघ्या काही मिनिटात अत्यंत क्रूरपणे ज्या पद्धतीने ही हत्या केली त्यावरून आरोपींनी हत्येचे प्रशिक्षण घेतलेले होते आणि त्यानंतरच हा प्रकार केलेला आहे असा आरोप सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला होता त्यावर न्यायालयाने देखील सहमती दर्शवत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 


Spread the love