महाराष्ट्रात एक धक्कादायक असा छेडछाडीचा प्रकार समोर आलेला असून मजूर काम करणाऱ्या महिलेला सोबत ‘ चल तुला राणी बनवतो ‘ असे म्हणत तिचा विनयभंग करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भंगार साहित्य विकणाऱ्या एका व्यक्तीच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी त्यानंतर आरोपीचे भंगार साहित्याचे दुकान पेटवून दिले.
उपलब्ध माहितीनुसार , जमील खान आताऊल्ला खान असे आरोपी व्यक्तीचे नाव असून 35 वर्षीय महिलेने त्याच्या विरोधात बुलढाणा पोलिसात फिर्याद दिली आहे. महिला डंपिंग ग्राउंडवर मजुरी काम करत असून आरोपी वेळेच्या आधी तिथे यायचा आणि महिलांना अश्लील भाषेत बोलायचा. आरोपीने महिलेला माझ्यासोबत चल तुला राणी बनवतो असे म्हणत विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केलेला आहे.