महाप्रसादाला म्हणून घेऊन जात तरुणीवर सामूहिक बलात्कार , रात्रभर पाच जण..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून महाप्रसादाला घेऊन जातो असे सांगत ते वीस वर्षीय तरुणीला अमरावती जिल्ह्यातील मालखेड येथे आणण्यात आले आणि त्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने शेतातील झोपडीत नेऊन पाच जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केलेला आहे. 

फिर्यादी तरुणीने विरोध केला त्यानंतर तिला जबर मारहाण देखील करण्यात आलेली असून शेंदूर जनाघाट पोलिसांनी 29 जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपींच्या विरोधात अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्व पाचही आरोपींना अटक करण्यात आलेली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे. 

महेश वाघमारे ( वय 25 ) , पिंटू हरले ( वय 39),  रमेश भलावी ( वय 40 ), इस्माईल खान ( वय 65 ), नितीन ठाकरे ( वय 25 सर्वजण राहणार मालखेड ) असे आरोपी व्यक्तींची नावे असून महेश याने 23 वर्षीय फिर्यादी तरुणीला तिच्या आईजवळून महाप्रसादासाठी घेऊन जातो असे सांगत घेऊन गेला आणि तिला रात्रभर स्वतःच्या घरी ठेवले. 

28 जानेवारी रोजी तिच्या गावी घेऊन जाण्यासाठी आरोपीने तिला दुचाकी वर बसवले आणि पिंटू हरले याला सोबत घेत मालखेड शिवारातील शेतात तिला आरोपी घेऊन गेले . रात्री दोन्ही आरोपींनी तिच्यासोबत अतिप्रसंग केला आणि याच दरम्यान इतर तीन आरोपी तिथे पोहोचले आणि त्यांनी देखील तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला . शेंदूर घाट पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत . 


Spread the love