तरुणीचे ‘ नको ते ‘ फोटो पुण्यात व्हायरल , पोलीस गोव्यात गेले अन ..

Spread the love

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून प्रेम संबंध तोडल्यानंतर आपल्या मैत्रिणीची असलेली चित्रफित सोशल मीडियात व्हायरल करून देणाऱ्या गोव्यातील एका फाइव स्टार हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी अटक केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , विनय मारुती शेकापुरे ( वय 23 वर्ष सध्या राहणार पणजी गोवा मूळ राहणार मुखेड जिल्हा नांदेड )असे आरोपी व्यक्तीचे नाव असून शेकापुरे याचे पुण्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्याने तिची व्हिडिओ क्लिप तयार केली आणि त्यानंतर मुलीने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले म्हणून त्याने ती व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध करण्याची धमकी दिलेली होती. 

सदर बाब मुलीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने तात्काळ सहकार नगर पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली असून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी हा गोव्यातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी हॉटेलच्या बाहेर सापळा रचला आणि गोव्यातून त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे.


Spread the love