शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात धक्कादायक असा प्रकार मांजरी परिसरात समोर आलेला असून एका शाळकरी मुलीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आलेली आहे. दोन जणांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेली असून 30 जानेवारी रोजी हे प्रकरण समोर आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अनुराग अण्णा साळवे ( राहणार आनंदनगर मुंढवा ) आणि गणेश म्हेत्रे ( राहणार शिंदे वस्ती मुंढवा ) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून त्यांच्या विरोधात पीडित मुलीने हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पीडित मुलीची एका मैत्रिणीच्या माध्यमातून आरोपी साळवे आणि म्हेत्रे यांच्यासोबत ओळख झालेली होती. दोन्ही आरोपींनी बहिणीच्या वाढदिवसाला जायचे आहे असे सांगत तिला गाडीवर नेले आणि त्यानंतर मांजरी परिसरात अनुराग आणि गणेश या दोघांनी तिच्यावर धमकावत बलात्कार केला . घरी आल्यानंतर मुलीने या प्रकरणाची माहिती दिली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.