शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून पिंपरी चिंचवड येथील क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक असलेला असलेल्या 58 वर्षीय व्यक्तीवर दहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीला यासाठी मदत करणाऱ्या अकॅडमीच्या माजी विद्यार्थिनीला देखील पोलिसांनी अटक केलेली असून दोन्ही जणांची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे. पीडित मुलीचे वय अवघे सोळा वर्षे आहे असून तिच्या वडिलांनी 30 जानेवारी रोजी रावेत पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिलेली होती.
उपलब्ध माहितीनुसार , नौशाद अहमद शेख ( वय 58 वर्ष ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पिंपरी चिंचवड शहरात शेख हा क्रिएटिव्ह अकॅडमी नावाने निवासी शाळा चालवतो . 2021 मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी दोन लाख 26 हजार रुपये भरून अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला होता आणि मुलींच्या होस्टेलच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आरोपी नौशाद राहतो.
आरोपीवर फिर्यादी मुलगी ही अवघी 14 वर्षांच्या असताना तिच्यावर अत्याचाराचा आरोप असून 2022 मध्ये त्याने फ्लॅटवर बोलावून तिचा विनयभंग करण्याचा देखील प्रयत्न केला मात्र मुलीने त्याला विरोध केला. आरोपीने त्यानंतर तुझ्या घरच्यांना फोन करून येथील मुलांसोबत तुझे संबंध आहेत असे सांगेल असे धमकावू लागला . धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी पीडित मुलीला आरोपी याच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी एका माजी विद्यार्थिनींने देखील दबाव आणला होता.
सदर प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी माध्यमांना माहिती देताना , ‘ पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता आहे . घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ यांची नेमणूक विशेष तपास अधिकारी म्हणून केलेली आहे . शेख याचा मोबाईल जप्त केला असून त्याच्या मोबाईल मध्ये अनेक अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडलेले आहेत असे म्हटले आहे.