संपूर्ण जग ‘ डिजिटल मोड ‘ मध्ये असताना देशात एक प्रकरण चर्चेत आलेले होते . चिनी लोकांनी हेरगिरीसाठी एका कबुतराचा वापर केला असा आरोप या कबुतरावर होता आणि त्यानंतर तब्बल आठ महिने त्याला पिंजऱ्यात काढावे लागलेले आहेत . मुंबईतील पशुवैद्यकीय दवाखान्यात या कबुतराला ठेवण्यात आलेले होते मात्र आता त्याची सुटका करण्यात आली आहे.
आरसीएफ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी माहिती देताना , ‘ परळ परिसरात असलेल्या एका पशुवैद्यकीय रुग्णालयाने या पक्षाला सोडण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती मागील वर्षी मे महिन्यात आरसीएफ पोलिसांनी या कबुतराला पकडलेले होते त्यावेळी त्याच्या पायाला दोन अंगठ्या बांधलेल्या होत्या आणि त्याच्या दोन्ही पंखाखाली चिनी लिपीत काहीतरी लिहिलेले होते. आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र तपास पूर्ण झाल्यानंतर हेरगिरीचा आरोप वगळण्यात आला आणि अखेर या कबुतराची सुटका करण्यात आली