पुण्यातील ही घटना आहे , डेटिंग अँपवर तरुणीला ‘ तो ‘ आवडला अन.. .

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून पुण्यातील ही घटना आहे . एका डेटिंग अँप वर ओळख झाल्यानंतर तरुणीची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली असून फसवणुकीचा आकडा हा तब्बल 27 लाख रुपयांचा आहे . तीस तारखेला हे प्रकरण समोर आलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , हर्षित कुमार राय ( वय 28 राहणार उत्तर प्रदेश ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तक्रारदार तरुणी आणि आरोपी यांच्या एका डेटिंग अँप वर ओळख झालेली होती. आरोपीने तिला विवाहाचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढले आणि वेगवेगळी कारणे दाखवत तिच्याकडून 27 लाख रुपये उकळले. पैशाबाबत विचारणा केली त्यावेळी त्याने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्याचे तिचे म्हणणे आहे . येरवडा पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. 


Spread the love