सोशल मीडिया स्टार आणि अहिराणी गाण्यावरून ओळख बनवलेला युट्युबर एका वेगळ्याच वादात सापडलेला असून विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत असे या व्यक्तीचे नाव आहे . केसावर फुगे.. झुमका वाली पोरं अशा गाण्यांनी लोकप्रिय झालेला सचिन कुमावत याच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात चक्क बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सचिन कुमावत हा युट्युब वर तसेच सोशल मीडियावर चांगला पॉप्युलर असून एका पीडित तरुणी सोबत ओळख वाढवत त्याने गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवले आणि मागील पाच महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केले. नाशिक रोड पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून शूटिंगच्या दरम्यान त्याची आणि पीडित तरुणीची ओळख झालेली होती.
पिडीतेच्या म्हणण्याप्रमाणे , सचिन कुमावत याने लग्नाचे आमिष दाखवत 30 ऑगस्ट 2022 पासून 17 जानेवारी 2023 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन तिचे लैंगिक शोषण केले . पीडित तरुणीने त्याला लग्नाची विचारणा केली त्यावेळी तो तिला शिवीगाळ करू लागला आणि अखेर त्याने लग्न करण्यास नकार दिला. शनिवारी तीन तारखेला रात्री त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.