पुणे हादरलं..कांदा कापण्याच्या सुरीने संतप्त झालेल्या बायकोने.. 

Spread the love

घरातील किरकोळ वादातून संतप्त झालेल्या पत्नीने पतीवर कांदा कापत असलेल्या सुरीने वार केल्याची घटना पुण्यात समोर आलेली आहे . हडपसर परिसरातील ही घटना असून रोज जेवणात चुका काढतो म्हणून संतप्त झालेल्या पत्नीने कांदा कापत असताना हातात असलेल्या चाकूने पतीवर वार केला . पतीने हडपसर पोलिसात जाऊन पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , नमिता श्रवण माने ( वय 33 वर्ष राहणार झेड कॉर्नर मांजरी ) असे आरोपी पत्नीचे नाव असून तिच्या विरोधात श्रवण माने ( वय 33 राहणार झेड कॉर्नर मांजरी ) यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. 

सर्व काही सामान्य सुरू असताना किरकोळ वादावरून पत्नी आक्रमक व्हायची मात्र त्याकडे पती दुर्लक्ष करत असायचे आणि अनेकदा जेवणावरून देखील पती सतत तक्रार करायचा त्यामुळे देखील वादात भर पडत होती . आपला पती जेवणात सतत काही ना काही चुका काढतो यामुळे एक फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला त्यानंतर नमिता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


Spread the love