महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मैत्रीच्या नावाखाली एका 42 वर्षे विवाहित महिलेवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल आणि मारहाण करणारा व्यक्ती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात नागरिकांच्या तावडीत सापडला आणि नागरिकांनी त्याच्यावर चांगलाच हात साफ करत त्याला नौपाडा पोलिसांच्या हवाली केलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , महिला उल्हासनगर मध्ये नोकरीला असून ठाणे येथे राहते . सदर प्रकरणातील आरोपी राकेश दामोदर साधवानी ( वय 32 राहणार उल्हासनगर ) याच्यासोबत तिची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले . आरोपी राकेश याने तिला मैत्रीचा बहाना करत अनेकदा वेळोवेळी ठिकठिकाणी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आणि महिलेने विरोध केल्यानंतर त्याने तिचा अश्लील फोटो पतीला आणि मुलाला पाठवला आणि तिला मारहाण देखील केली.
राकेश याच्या या प्रकाराने महिला आतून पूर्णपणे तुटली आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वीच तिने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. पतीने तिला विश्वासात घेत अखेर एक फेब्रुवारी 2024 रोजी राकेश याच्याविरोधात बलात्कार विनयभंग मारहाण तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला . सर्व प्रकार होऊन देखील राकेश ठाण्यातील जिल्हा रुग्णालय परिसरात फिरत असल्याचे नागरिकांना दिसले त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि नौपाडा पोलिसांच्या हवाली केली.