देशात एक अजब प्रकरण सध्या समोर आलेले असून थायलंडची राजधानी असलेली बँकॉक इथून मुंबईत आलेल्या दोन प्रवाशांनी शरीरामध्ये तब्बल दीड किलो सोने लपून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केलेला आहे . सीमा शुल्क विभागाने तात्काळ त्यांना अटक केलेली असून धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चक्क गुदद्वारात हे सोने लपून आलेले होते . आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याची किंमत सुमारे 87 लाख रुपये आहे.
उपलब्ध माहितीनुसार , बँकॉक येथून सोने आणून त्याची तस्करी मुंबईत होत असल्याची माहिती मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी मिळाली होती आणि दोन व्यक्ती हे सोने घेऊन येणार आहेत असे देखील माहिती गुप्त सूत्रांकडून मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी सापळा रचला होता.
हुसेन भाटिया आणि बुराउद्दीन या दोन व्यक्ती विमानातून उतरल्या त्यावेळी त्यांना चौकशीसाठी म्हणून बाजूला घेण्यात आले आणि त्यांची तपासणी केली त्यावेळी दोनही व्यक्तींनी गुद्दद्वारात सुमारे 87 लाख रुपयांचे सोने लपवलेले होते असे आढळून आले . दोन्ही जणांना अटक करण्यात आलेली असून याआधी जीन्स पॅन्ट च्या प्रिंटिंगमध्ये सोने लपवल्याची देखील बाब समोर आलेली होती.