पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून खराडी परिसरात एका विवाहित गरोदर महिलेने सासरच्या छळाला कंटाळून अखेर आत्महत्या केली आहे . एक तारखेला गुरुवारी हा प्रकार समोर आलेला असून महिलेच्या पतीसोबत इतर तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , प्रणिता आकाश गायकवाड ( वय 22 वर्ष ) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव असून तिचे काका नचिकेत शिवाजी भोसले ( राहणार पिसोळी ) यांनी गुरुवारी चंदन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिलेली आहे.
आकाश गायकवाड ( वय ३५ ), लक्ष्मीबाई गायकवाड ( वय 45 ) आणि सासरा अंकुश गायकवाड ( वय 50 ) अशी आरोपी व्यक्तींची नावे आहेत .
प्रणिता हिचा विवाह आकाश याचा सोबत मे 2023 मध्ये झालेला होता . लग्नानंतर दोनच महिन्यात आकाश आणि त्याच्या कुटुंबीयांनी , ‘ प्रणिता हिला स्वयंपाक नीट करता येत नाही लग्न मोठे मोठे करून दिले नाही म्हणून तिचा छळ सुरू केला . ती गरोदर असताना डोहाळे जेवण करून डोहाळे जेवण देखील मोठे करून द्या , ‘ अशी देखील मागणी केली जात होती. माहेरची परिस्थिती खराब असल्याकारणाने प्रणितावर त्याचा तणाव आला आणि तिने टोकाचे पाऊल उचलत घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.