नवऱ्याची ‘ अडचण ‘ व्हायची ,  प्रियकराचे दोन अल्पवयीन मित्र हाताशी धरले आणि

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण समोर आलेले असून कल्याण जवळील डोंबिवली येथे अनैतिक संबंधातून एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची अत्यंत अमानुषपणे हत्या केलेली आहे . हत्या केल्यानंतर पत्नीने पुरावे नष्ट करण्यासाठी पतीचा मृतदेह एका मोठ्या दगडाला बांधून विहिरीत फेकून दिलेला होता आणि स्वतः पोलिसात जात मिसिंगची तक्रार दाखल केलेली होती मात्र अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , रिता चंद्रप्रकाश लोवंशी आणि तिचा प्रियकर असलेला सुमित राजेंद्र विश्वकर्मा अशी आरोपी व्यक्तींची नावे असून रिता हिने दोन अल्पवयीन मित्रांच्या मदतीने 20 तारखेला पती चंद्रप्रकाश कामावरून येत असताना त्यांना त्यांचे अपहरण करून जंगलात नेऊन चाकूने वार करत त्यांचे हत्या केली आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी रात्री दीडच्या सुमारास डोंबिवलीतील आडीवली गावात एका विहिरीत पतीचा मृतदेह दगडाला बांधून फेकून दिलेला होता. 

पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर मानपाडा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली . चंद्रप्रकाश यांचा शोध पोलीस घेत असताना 25 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता विहिरीत एका इसमाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. 

चंद्रप्रकाश लोवंशी यांची पत्नी रिता हिच्याकडे चौकशी केली त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे तिच्यावर पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसी खाक्या दाखवताच तिने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिलेली आहे . सुमित आणि रिता यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते आणि पती त्यात अडथळा ठरत असायचा म्हणून चार महिन्यांपासून कट रचून अखेर 20 जानेवारी रोजी व तिची हत्या आरोपींनी केलेली होती. मृतदेह सापडताच अवघ्या २४ तासात पोलिसांनी रीता आणि तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा यांना गजाआड केलेले आहे. 


Spread the love