बारामतीतील लॉजमध्ये महिलेचा मृतदेह आढळला,  नवऱ्यासोबत आली खरी पण.. 

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार बारामती शहरात समोर आलेला असून शहरातील मध्य बाजारपेठेत सिनेमा रोडवरील एका लॉजमध्ये महिलेचा खून झाल्याचे प्रकरण समोर आलेले आहे . चार तारखेला हा प्रकार समोर आलेला असून मयत महिलेचे वय 36 वर्षे आहे. बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील गंगासागर लॉज येथे ही खुनाची घटना घडली. 

उपलब्ध माहितीनुसार , रेखा विनोद भोसले ( राहणार सोनवडी तालुका दौंड ) असे मयत महिलेचे नाव असून खून झालेल्या महिलेचे नाव असून तिच्यासोबत तिचा पती विनोद भोसले हा देखील याच लॉजमध्ये आलेला होता. पत्नीचा खून करून आरोपी फरार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे . 

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पतीनेच हा खून केला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे पती- पत्नी गेल्या तीन वर्षांपासून विभक्त राहत होते. घटस्फोटाच्या कारणावरुन त्यांच्यात वाद होता. त्यातूनच पतीने हा प्रकार केला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनेनंतर पती लॉजमधून पसार झाला आहे.


Spread the love