भुरट्या चोरांनी खाल्ल्या तहसीलदारांसह पाच जणांच्या नोकऱ्या , पुण्यातील प्रकरण

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण शिक्षणाचे माहेरघर असलेले पुण्यात समोर आलेले असून पुण्यातील सासवड तहसील कार्यालयाचे कुलूप तोडून काही चोरट्यांनी ईव्हीएम यंत्रे लांबवलेली आहेत. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तात्काळ तहसीलदार आणि डीवायएसपी आणि एसडीओ यांना निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहे तसेच 12 फेब्रुवारीपर्यंत आयोगाला अहवाल सादर करण्यास देखील सांगितलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , काही ईव्हीएम मशीन सासवड येथील तहसीलदार कार्यालयात ठेवण्यात आलेल्या होत्या मात्र स्ट्रॉंग रूमचा दरवाजा सोमवारी उघडा दिसला त्यानंतर तहसीलदार विक्रम राजपूत यांनी प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांना या संदर्भात माहिती दिली. पोलिसांना देखील याप्रकरणी कळविण्यात आले आणि पोलीस निरीक्षक संतोष जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे घटनास्थळी पोहोचले. 

सहाय्यक फौजदार डी एल माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलेले आहे त्यानंतर बुधवारी वरील तीन अधिकाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलेले आहे तर दुसरीकडे चोरी करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आलेली असून भैय्या उर्फ शिवाजी रामदास बंडगर ( वय 21 )  अजिंक्य राजू साळुंखे ( वय 21 दोघेही राहणार माळशिरस तालुका पुरंदर जिल्हा पुणे ) यांना अटक करण्यात आलेली आहे . दोघेही सराईत चोरटे असून तहसील कार्यालयातून मतदान यंत्र चोरीला गेल्यानंतर राज्यभरात खळबळ उडालेली होती. 


Spread the love