तब्बल सात दिवस बलात्कार केला , महिलेच्या अंगावर गरम डाळ अन..

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण नवी दिल्ली येथे समोर आलेले असून दार्जिलिंग येथील एका महिलेवर तिच्या मित्राने सात दिवस बलात्कार केला आणि त्यानंतर तिला फक्त मारहाणच केली नाही तर चक्क गरम शिजवलेली डाळ तिच्या अंगावर टाकून तिला टॉर्चर करण्याचा देखील त्याने प्रयत्न केलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , दिल्लीतील नेबसराय पोलीस स्टेशन येथे एका महिलेला तिच्या पतीकडून मारहाण होत असल्याबद्दल फोन आला होता . पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यावेळी महिलेच्या अंगावर मोठ्या प्रमाणात भाजल्याच्या जखमा होत्या. तब्बल वीस ठिकाणी तिच्या शरीरावर जखमा असून एम्समध्ये तिला ऍडमिट करण्यात आलेले आहे. 

पारस ( वय 28 ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तो मूळचा उत्तराखंड येथील रहिवासी आहे . दिल्लीतील एका हॉटेलमध्ये तो स्वयंपाकी होता . पीडित महिलेला नोकरीसाठी बंगळूर येथे जायचे होते. तिची ट्रेन दिल्लीवरून येणार म्हणून तिने पारसला भेटण्याचे ठरवले होते मात्र पारसने तिला जाऊ न देता तिच्यावर अत्याचार केला आणि स्वतः सोबत ठेवले.आरोपीच्या विरोधात आयपीसी कलम 323 जाणीवपूर्वक दुखापत करणे , 376 बलात्कार , 377 अनैसर्गिक शारीरिक संबंध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


Spread the love