प्रज्वल रेवण्णा प्रकरणात आणखीन एका महिलेची इन्ट्री , आरोपी महिलेने आणखीन एका.. 

Spread the love

कर्नाटकातील हसन येथील भाजपचा मित्र पक्ष असलेल्या जेडीयुचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांचे सेक्स कॅण्डल समोर आल्यानंतर एका महिलेचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आलेली होती. सदर प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांची आई भवानी रेवण्णा यांच्यावर संशय होता. सात तारखेला शुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या विशेष पथकासमोर सादर झाल्या असून न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन अटकेपूर्वीच मंजूर केलेला आहे. 

आपला मुलगा प्रज्वल रेवण्णा याला मदत करण्यासाठी भवानी यांनी एका महिलेचे अपहरण केले असा त्यांच्यावर आरोप होता. प्रज्वल रेवणा सध्या एसआयटीच्या कोठडीत असून सुमारे 3000 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ त्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. प्रज्वल रेवण्णा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेला असून गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो जर्मनीला पळालेला होता मात्र पुन्हा तो भारतात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे.


Spread the love