आर्यन खान प्रकरणातील सर्वात महत्वाचा असलेला पंच केपी गोसावी याला आज सकाळी अटक केल्यानंतर अखेर पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्यामुळे गोसावीला जामीन मिळतो की पोलीस कोठडी ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पोलीस कोठडी मिळण्याची जास्त शक्यता असल्याने आता तो कुणाची पोलखोल करणार ? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे .
कोण आहे किरण गोसावी ?
केपी अर्थात किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची 2018 मध्ये फसवणूक केल्याचा गोसावीवर आरोप आहे.
देशमुखला मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी त्याची तीन लाखांना फसवणूक केली होती. 2018 मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे मात्र ही अटक ही आर्यन खान प्रकरणात त्याला बोलते करण्यासाठीच केली असल्याची चर्चा आहे .
किरण गोसावींला बोलते करण्यात पोलिसांना यश आले तर अनेक धक्कादायक सत्य समोर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे . दोन दिवसापूर्वी किरण गोसावी हा हिंदी भाषिक पोलीस अधिकाऱ्याला सरेंडर करण्यासाठी विनवणी करत असल्याची एक क्लिप सोशल मीडियावर फिरत होती अन तो अधिकारी ‘ दुसरीकडे जा ‘ असा सल्ला त्याला देत होता. किरण गोसावी हा आर्यन खान यांचावर कारवाई झाली तेव्हा तिथे आढळून आला होता तर त्याचे भाजप कनेक्शन असल्याचा देखील आरोप नवाब मलिक यांनी केला होता .