नगर हादरले.. अखेर त्याच्या ‘ तसल्या ‘ त्रासाला वैतागून अल्पवयीन मुलीने घेतले विष

Spread the love

नगर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आरोपीकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून शहरातील एका अल्पवयीन मुलीने विष घेतले आहे आहे. बुधवारी पहाटे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला, या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी बुधवारी संध्याकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात मुलीचा मृतदेह आणून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची व त्याला अटक करण्याची मागणी केली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अबिद पापाभाई मोमीन शेख उर्फ मुन्ना शेख ( राहणार वाघ गल्ली नालेगाव नगर ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख याने सदर मुलीचे फोटो काढून तिला लग्नाची मागणी घातली होती तसेच मोटारसायकलवरून तिचा पाठलाग केला होता. जर माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुला ठार मारेन, अशी धमकी देखील त्याने दिली होती. त्याच्या त्रासाला कंटाळून 20 ऑक्टोबर रोजी मुलीने विष घेतले होते.


Spread the love