महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना वसई इथे उघडकीस आली आहे. मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका महिलेचा पाठलाग करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याने महिलेने सतर्कता दाखवत आरडाओरडा सुरु केला आणि त्यानंतर नागरिक जमा झाले आणि त्यांनी या टवाळखोराला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंबईजवळच वसईत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे .
उपलब्ध माहितीनुसार ,संबंधित महिला शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास मॉर्निंग करत होती. त्यावेळी शेष पाल नावाच्या तरुणाने तिचा पाठलाग सुरु केला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत अश्लील वर्तन देखील केले. महिलेने मात्र आरडाओरडा करत नागरिकांना जमा केले आणि त्यानंतर नागरिकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. वसईतील पश्चिम भागात सनसिटी परिसरात ही घटना घडली आहे.
महिलेने हा प्रकार नागरिकांना सांगितलं मात्र तोवर आरोपी पळून जाऊ लागला होता नागरिकांनी माथेफिरुचा पाठलाग केला आणि त्याला पकडून स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर वसईतील माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सतर्क महिलेच्या धाडसामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे.