महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून भिवंडी येथे आठवड्याची गर्भवती असलेल्या 22 वर्षीय महिलेला घरात घुसून शिवीगाळ केली आणि तिला मारहाण देखील करण्यात आली त्यामुळे तिचा अनैसर्गिक गर्भपात झाला . शहरातील कामतघर परिसरात ही धक्कादायक उघडकीस आली आहे. आरोपीच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुजित उर्फ लल्ला वर्मा असे आरोपीचे नाव असून आरोपी सुजित वर्मा आणि पीडित महिलेचा पती अमर चौधरी या दोघांमध्ये 10 ऑक्टोबर 2021 किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती त्यानंतर महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात या विषयी तक्रार देखील दिली होती.
माझ्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार का दिली ? अशी विचारणा करत दोन जानेवारीला दुपारी महिलेचा पती घरात नसताना आरोपी सुजित हा घरात घुसला आणि पीडितेला शिवीगाळ केली आणि तिला धमकी देत दांडक्याने मारहाण केली. त्यामध्ये तिच्या पोटावर मारल्याने रक्तस्राव होऊन सदर महिलेचा गर्भपात झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे .