‘ बायकोला घेऊन या अन मेहुणीला घेऊन जा ‘ , जावयाने मर्यादा ओलांडली…

Spread the love

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना राजस्थानच्या कोटा शहरातून समोर आली असून पत्नी रुसून माहेरी निघून गेली म्हणून संतापात एका भावोजीने आपल्या अल्पवयीन मेहुणीसोबत बलात्कार केला असून पीडितेच्या वडिलांनी पोलिसात धाव घेत या जावयाच्या विरोधात तक्रार दिली आहे.पीडितेला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असताना आरोपीने तरूणीला ४ दिवस आपल्यासोबत ठेवलं आणि अनेकदा अत्याचार केला, असे तिने म्हटलेले आहे .

उपलब्ध माहितीनुसार , सदर घटना ही कोटाच्या नयापूर भागातील असून सदर प्रकाराच्या आधी आरोपीचं दीड वर्षाआधी लग्न झालं होतं. आरोपी मजुरीचं काम करत असून त्याला दारूची सवय असल्याने आरोपी आणि त्याच्या पत्नीत कायमच भांडणं होत होती. नेहमीच्या भांडणाला आणि पतीच्या दारूच्या सवयीला कंटाळून त्याची पत्नी माहेरी राहू लागली होती त्यामुळे पती हा माहेरच्या लोकांवर खार खाऊन होता .

काही दिवसांपूर्वी आरोपी १७ वर्षीय मेहुणी शिकत असलेल्या कॉलेजमध्ये गेला आणि तिथून फर्स्ट ईअरमध्ये शिकत असलेल्या मेहुणीला घेऊन फरार झाला. तरूणी घरी पोहोचली नसल्याने कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी संशयाच्या आधारावर आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तरूणीला सोडवलं असून त्यानंतर पीडितेने आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला आहे . ‘ माझ्या बायकोला घेऊन या आणि मग मेहुणीला घेऊन जा ‘, असे देखील आरोपी म्हणत असल्याचे पीडितेने म्हटले आहे .


Spread the love