मुंबईत चिंता वाढली..आज तब्बल ‘ इतके ‘ नवीन रुग्ण तर सात जणांचा मृत्यू

Spread the love

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे.मुंबईत आज 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत सध्या 1 लाख 17 हजार 437 रुग्ण सक्रीय आहेत.

मुंबईत आज 19 हजार 474 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज सात मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय 8 हजार 63 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळं मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 78 हजार 119 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 85 टक्क्यांवर गेलाय.

मुंबईत आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी 1 हजार 240 रुग्ण हे आज रुग्णालयात भरती झाले आहेत. मुंबईत दिवसभरात एकूण 68,249 कोरोना चाचणी करण्यात आलीय. मुंबई एकूण 17 कंटेनमेंट झोन आहेत. मुंबई महानगरपालिकेनं आतापर्यंत एकूण 123 इमारती सील केल्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 41 दिवसांवर पोहचलाय.


Spread the love