महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना उघडकीस येत असताना अशीच एक धक्कादायक घटना पुणे येथे उघडकीस आली आहे. पुणे येथील या घटनेत एका बहिणीने दुसऱ्या बहिणीची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेली महिला ही तेलंगाना येथील रहिवासी असून तिची बहीण ही पुण्यात राहते.
तेलंगणातील या महिलेने पुण्यात एक फ्लॅट घेतला होता आणि या फ्लॅटमध्ये भाडेकरू ठेवण्यासाठी तिने पुणे येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीला पावर ऑफ ऍटर्नी दिली होती मात्र पावर ऑफ अटॉर्नी आपल्या हातात आल्यानंतर बहिणीची नियत फिरली आणि आणि तिने याचा वापर करत बहिणीच्या फ्लॅटवर तब्बल 1 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज घेतले.
फ्लॅटचा मालक असलेल्या जुली गिरीश अय्यर ( वय 44 राहणार हैदराबाद) यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत जुली यांची बहीण ज्योती राजू नायर ( वय 47 ) व ज्योती हिचा पती राजू नायर आणि त्यांना अर्थ पुरवठा करणारी रेलिगेअर इन्वेस्टवेस्ट लिमिटेड या अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थेवर गुन्हा दाखल केला आहे.