पुणे हादरले..तळेगाव दाभाडेच्या लॉजवरचे पिडीतेचे फोटो पतीच्या मोबाईलवर आले अन ..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली असून एका विवाहित महिलेचे फोटो काढून ते फोटो तिच्या पती व नातेवाईकांना पाठवून बदनामीची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . पीडित महिलेने या प्रकरणी शुक्रवारी सात तारखेला तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संदीप बुरुटे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे आरोपीचे नाव असल्याचे समजते.

उपलब्ध फिर्यादीनुसार , संदीप बुरुटे याने हा गुन्हा तळेगाव दाभाडे व चाकण येथे २० एप्रिल २०१९ ते २० ऑगस्ट २०२१ या कालावधीत केलेला असून आरोपीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून फिर्यादीचे फोटो काढले. फिर्यादीचे तसले फोटो हे आई-वडील नातेवाईक तसेच पती यांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली आणि फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध फिर्यादी सोबत वारंवार लैंगिक संबंध केले.

तळेगाव दाभाडे तसेच चाकण येथे वेगवेगळ्या हॉटेल व लॉजवर आरोपीने फिर्यादीला घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. बलात्कार प्रकरणी आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


Spread the love