यवतमाळच्या डॉक्टरांवर गोळीबाराचे धक्कादायक कारण अखेर आले समोर..

Spread the love

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथे डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्यावर भर बाजारात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यावर एकाच खळबळ उडालेली होती मात्र या घटनेमागचे कारण शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून डॉ. हनुमंत धर्मकारे रुग्णालयात ड्युटीवर असताना एका उमरखेडमधील अपघातग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर योग्य उपचार झाले नाही आणि केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला याची खुन्नस मनात ठेवून हा हल्ला डॉक्टरांवर केला गेल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण ?

यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरवर भर दिवसा गोळीबार करून त्यांचा अमानुषपणे खून करण्यात आला होता. ही धक्कादायक घटना मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पुसद मार्गावरील गोरखनाथ हॉटेलच्या समोर घडली होती.डॉक्टर हनुमंत धर्मकारे ( वय 45 ) यांच्यावर अज्ञात युवकाने चार गोळ्या झाडल्या होत्या.

मयत डॉक्टर हे मूळचे नांदेड येथील असून गेल्या सात वर्षांपासून शासकीय उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ञ म्हणून कार्यरत होते. बसस्थानकासमोर त्यांनी खासगी रुग्णालय देखील सुरू केले होते. मंगळवारी साडे चारच्या सुमारास ते रुग्णालयाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले होते. चहा पिऊन बाहेर येताच अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तेथून पलायन केले होते.


Spread the love