देशात लोक पैसे कमावण्यासाठी काय करतील याचा नेम राहिलेला नाही अशीच एक घटना गुजरात इथे उघडकीस आली असून आर्थिक अडचणीत असलेल्या एका शेतकऱ्याने वेगळीच शक्कल लढवली आहे . शेतकरी तरुणाने एक मुलीच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये चक्क ‘ कॉलबॉय हवा ‘ आणि उत्तम पैसे दिले जातील अशी जाहिरात दिली आणि त्यानंतर मात्र वेगळाच प्रकार घडत गेला.
शेतकऱ्याने हे अकाऊंट चक्क जिनल मेहता नावाने बनवले होते .एका व्यापाऱ्याकडे हिऱ्यांच्या दुकानात नोकरी करणारा एक कामगार या जाहिरातीला भुलला. आणि त्याने शेतकऱ्याच्या खात्यावर 29 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. शेतकऱ्याने पीडित तरुणाकडे नग्न फोटो-व्हिडीओंची मागणी केली आणि फोटो येताच आरोपीने त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
आता आपल्याला काही काम मिळेल या आशेने वाट पाहणाऱ्या तरुणाच्या नशीबी निराशाच आली अन त्याची सोशल मीडियात पैसे खर्च करून बदनामी झाली. धक्कादायक म्हणजे त्याचे हे फोटो चक्क त्याच्या नातेवाईकांपर्यंत देखील पोहचले. गुजरातमधील भावनगरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली असून आरोपी शेतकऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे तरुणाची तक्रार ?
पीडित तरुण हा २९ वर्षांचा असून अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत होता. तो ऑनलाईन नोकरीच्या शोधात असताना फेसबुकवर जिनल मेहता नावाच्या तरुणीचे अकाऊंट त्याने पाहिले. ज्यामध्ये कॉलबॉयची गरज असून रोज पाच हजार रुपये मिळतील अशी जाहिरात देण्यात आली होती. तरुणाने जाहिरातीत खाली दिलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज केल्यावर त्याला 6 महिन्यांच्या नोकरीसाठी 1000 रुपये आणि एक वर्षाच्या नोकरीसाठी 2000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आले.
पीडित तरुणाने जास्त दिवस काम मिळेल या आशेने गुगल पेचा वापर करून दोन वर्षाचे दोन हजार रुपये शुल्क देखील भरले आणि त्यानंतर श्वेता नावाच्या मुलीने त्याला व्हॉट्सअॅपवरून हॉटेल बुक करणार असल्याचे सांगितले. माझ्या वडिलांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. सध्या हॉटेल बुकिंगसाठी सहा हजार रुपये ट्रान्सफर करा, असं तिने सांगितलं आणि त्यानंतर या तरुणीने पीडित युवकाकडून वेगवेगळ्या कारणास्तव 29 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली असून आरोपी भीमाभाई उर्फ भीमो राजूभाई भम्मर या शेतकऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.