देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना अशीच एक घटना मध्यप्रदेशच्या इंदोर इथे समोर आलेली असून एका दुहेरी हत्याकाडांच रहस्य पोलिसांनी विक्रमी वेळेत उलगडत आरोपीस गजाआड केले आहे . महिलेचा पती सातत्याने पत्नीवर संशय घेत होता आणि त्यातून त्याने या महिलेचा आणि तिच्यासोबत असलेल्या तिच्या ११ वर्षाच्या मुलाची देखील हत्या केली आहे . आरोपीचे नाव कमलेश असल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,आरोपीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी आणि मुलाची हत्या केली आणि तो फरार झाला. हत्येची सूचना घर मालकाने पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीस महाराष्ट्रातील अकोल्यातून अटक करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीची पत्नी आणि मुलगा झोपलेले असताना त्याने दोघांवर सिलेंडर फेकलं आणि नंतर धारदार शस्त्राने दोघांचा गळा कापला. आई आणि मुलाचा जागीच मृत्यू होताच तो तेथून फरार झाला होता.
मृत महिलेचं हे पाचवं लग्न असून तरीही महिलेचं कुणासोबत तरी अफेअर सुरू होतं असा संशय पतीच्या मनात येत असायच त्यातून त्याने हे अघोरी कृत्य केले आहे . पोलीस आयुक्त धमेंद्र सिंह भदौरिया यांनी, मंगेश जो आरोपी कमलेशचा मित्र आहे. त्याच्या जबाबाच्या आधारावर कमलेशचा शोध घेतला गेला आणि त्याला इंदुरपासून ४०० किलोमीटर दूर अकोल्यातून अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.