पुणे हादरले..’ अगं फ्रेंडशिप देतेस का ? ‘, मुलीच्या भावाने पाहिले अन..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे इथे घडलेली असून फ़्रेंडशिपच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीचा हाथ पकडला म्हणून मुलीच्या भावाने एका मुलाला बेदम मारहाण केली आहे . शुभम कैलास दारवटकर (वय २२, रा. शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव असून तो एका अल्पवयीन मुलीला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दारवटकर (वय २२, रा. शुक्रवार पेठ ) हा गेल्या दोन आठवड्यापासून एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. ती शाळेत जात येत असताना तिच्याशी मैत्री करण्याकरीता तिच्या मागे मागे जाऊन सातत्याने तिच्याकडे पाहत होता. पीडित मुलगी शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कस्तुरी चौकातून शुभम याने तिचा पाठलाग करत ‘ मै तुम से फ्रेंडशीप करना चाहता हू, तूम मुझसे फ्रेंडशीप करो ‘ असे म्हणत भर रस्त्यात तिचा हात पकडला.

सदर प्रकाराची माहिती ही मुलीच्या भावाला समजताच त्यांनी शुभम याचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्याला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गुरुवार पेठेतील झुंजार मित्र मंडळासमोर अडवले आणि बेदम मारहाण केली. खडक पोलिसांनी शुभम याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली असून शुभम दारवटकर याने देखील फिर्याद दिली असून मुलीच्या भावांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Spread the love