महाराष्ट्रात अनेक वेगळ्या घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे. एका वीस वर्षीय तरुणीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून त्यात या तरुणीच्या बिनधास्त धमक्यांनी सोशल मीडिया चांगलाच गाजवला आहे .वादग्रस्त आणि आर्वाच्च भाषा वापरण्याच्या कारणावरून याआधी बऱ्याच तरुणांना पोलिसांनी अटक केल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र तरुणीचा हा व्हिडीओ समोर आल्यावर आता पोलीस काय कारवाई करतात ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे .
प्राथमिक माहितीनुसार सदर तरुणी पिंपरीतील थेरगाव येथील असून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर तिने हा व्हिडीओ टाकलेला आहे . उपलब्ध व्हिडिओत तरुणी म्हणतेय की, ”कुठला डॉन आणि कुठला कोण ? माझ्या नादी लागाल तर करील ३०२ ”. ३०२ म्हणजे खून केल्यानंतर लावलं जाणारं कलम आहे. अजून एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी ”शब्दाने शब्द वाढतात म्हणून शिव्या कधीच द्यायच्या नाहीत शक्यतो भांडणे हाणामारीनेच सोडवायची असतात.” असाही अजब सल्ला देताना दिसत आहे.
इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हिडिओ बनवणाऱ्यांची संख्या कमी नाहीये. यावर कुठलेही बंधन नसल्याने सोशल मिडियावर बरेच तरुण आपल्याला वाटेल त्या भाषेत व्हिडिओ करताना असल्याला पहायला मिळत आहेत. हातात बंदूक घेऊन किंवा कोयता घेऊन धमकी देण्याचे तरुणांचे व्हिडिओ समोर आले होते पण तरुणींचे असे वादग्रस्त व्हिडिओ समोर येऊ लागल्याने या व्हिडिओंची जोरदार चर्चा होते आहे .