देशात एक वेगळीच घटना समोर आलेली असून मध्य प्रदेशमध्ये आंघोळ करताना महिला पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ बनवून पीडित महिलेला ब्लॅकमेल केल्याचे गंभीर प्रकरण समोर आलेले आहे .महिला पोलीस अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरनेच हा व्हिडीओ बनवल्याचा त्याच्यावर आरोप असून भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . आरोपी सध्या फरार असल्याचे समजते.
महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, 22 सप्टेंबरला ती आंघोळ करत असताना कोणीतरी तिचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिला समजले. पीडित महिला अधिकाऱ्याने तिच्या बाथरुमच्या दाराखाली मोबाईल कॅमेरा पाहिला. महिला बाहेर येताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.आरोपी कॉन्स्टेबलचे नाव भूपेंद्र सिंह असे असून तो तक्रारदार महिला पोलीस अधिकाऱ्याचा वाहनचालक म्हणून तैनात होता.
सदर प्रकारानंतर भूपेंद्र सिंह पुन्हा या महिलेच्या घरी आला आणि त्याने तिच्याकडून 5 लाख रुपयांची मागणी केली आणि तसे न केल्यास तिला सोशल मीडियावर बदनाम करण्याची धमकी दिली. महिला अधिकाऱ्याने एसपी मुख्यालयाशी संपर्क साधला आणि त्यानंतर शहराच्या गुन्हे शाखेला प्राथमिक तपासात सदर प्रकारात तपासासाठी सहभागी करुन घेतले.
आरोपी पोलिस कॉन्स्टेबलवर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली आणि आयटी कायद्याच्या अनेक कलमांखाली ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार आहे.