कोल्हापूरमध्ये खळबळ..’ थांब तुला मोक्काचं लावतो ‘, सांगत जिल्हा अधीक्षक कार्यालयात बोलावले मात्र..

Spread the love

महाराष्ट्रात लाचखोरीची अनेक प्रकरणे उघडकीस आली असली तरी रंगेहाथ पकडले गेल्यानंतर देखील कुठलीच ठोस कारवाई होत नसल्याने लाच घेणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही, अशीच एक घटना समोर आली असून कोल्हापूर येथे बाईक चोरीच्या गुन्ह्यात अडकून ‘ तुला मोक्काअंतर्गत आत घालतो ‘अशी धमकी देऊन लाच स्वीकारताना शुक्रवारी गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन पोलिसांना जिल्हा अधीक्षक कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे. विजय केरबा कारंडे व किरण धोंडीराम गावडे अशी संशयितांची नावे आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील एका वकील असलेल्या व्यक्तीच्या मुलाने आठ दिवसांपूर्वी जुन्या वापरातील काही गाड्या खरेदी करून कोल्हापूरमध्ये आणल्या होत्या. त्यात दुचाकी स्क्रॅप करण्यासाठी आरटीओचे परवाने देखील त्यांनी घेतले होते मात्र विजय कारंडे आणि किरण गावडे यांनी सदर पुत्राला वकील पुत्राला चौकशीच्या नावाखाली बोलावले आणि तू पुण्या मुंबईतून चोरीच्या गाड्या आणून कोल्हापूरमध्ये विकतो का ? असा प्रश्न विचारला.

सदर वकील पुत्राने त्यानंतर आणलेल्या गाड्यांची रीतसर कागदपत्रे दाखवली असता आरोपींचे समाधान झाले नाही आणि त्यांनी तुला चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का लावतो आणि तुझी बदनामी करतो अशी धमकी दिली. प्रकरण मिटवायचे असेल तर आम्हाला 25 लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा कारवाई करू, अशी धमकी देखील दिली त्यामुळे सदर वकील पुत्राने घाबरून त्यांना दहा लाख रुपये देईल असे मान्य केले.

मात्र त्यानंतर आपल्या वडिलांचा सल्ला घेत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली आणि या दोन्ही कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आपल्याला पकडल्याचे लक्षात येताच आरोपी कारंडे यांनी पथकातील एका कर्मचाऱ्याच्या हाताला हिसका मारून अधीक्षक कार्यालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा पकडण्यात आले .


Spread the love