लातूरात भरदिवसा कोयत्याने सपासप वार , विद्यार्थ्याचा अखेर मृत्यू

Spread the love

बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यावर भरदिवसा कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. लातुरातील विशाल नगर भागात असलेलया श्री साई मंदिर भागात हा प्रकार घडला आहे एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी पाच संशयित मित्रांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लातूर शहरातील मोती नगर भागात वास्तव्याला असलेला रोहन सुरेश उजळंबे (२०) हा मुळचा लोदगा (ता. औसा) येथील रहिवासी आहे. तो इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. दरम्यान, विशाल नगरातील साई मंदिराशेजारच्या रस्त्यावर रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारा तो थांबवला होता. यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने रोहनच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानकपणे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि जमिनीवर कोसळला. काही समजायच्या आतच मारेकरी मोटरसायकलवरुन फरार झाले.

पोलिसांनी तातडीने त्याच्या वर्तुळातील पाच मित्रांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. खुनामागचे कारण मात्र, अद्याप समोर आले नाही. मयत रोहन उजळंबे आणि मारेकऱ्यामध्ये नेमका काय वाद होता? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. आरोपी निष्पन्न झाल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे.


Spread the love