महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर इथे उघडकीस आली आहे . विधवा महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर आठ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना शिरुर तालुक्यात उघडकीस आली आहे . शिरुर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत पाच आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर तीन जण फरार आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला विधवा असून घरी एकटीच राहत असून स्वभावाने भोळसर आहे त्यामुळे तिच्या स्वभावाचा फायदा घेत हे नराधम तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन घेत जात तिचे त्यांनी वेळोवेळी लैंगिक शोषण केले आहे. कधी घरामध्ये, शेतातील उसात, शाळेच्या पाठीमागे, नदी किनारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आरोपींनी तिचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे .
सर्व आरोपी आणि पीडित महिला एकाच गावातील रहिवासी असून महिला एकटी अबला असल्याने तिने विरोध केला असताना हे नराधम तिला जीवे मारण्याची देखील धमकी देत होते त्यामुळे महिला त्यांचा अटायचार निमूटपणे सहन करत होती. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता मात्र अखेर पीडितेला त्रास असह्य झाल्याने तिने पोलिसात धाव घेतली.
पोलिसांनी तात्काळ पावले उचलत या आठ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यापैकी पाच आरोपींच्या पोलिसांच्या मुसक्या आवळल्या असून तीन जण पळून गेले असून त्यांचा शोध सुरु आहे. माऊली पवार, रज्जाक पठाण, काळू वाकुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पू गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज व नवनाथ वाळुंज अशी बलात्कार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.