महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना मुंबई इथे अंधेरी स्टेशनसमोर असलेल्या एका एटीएममध्ये समोर आली आहे . एका महिलेला चक्क या आरोपीने पाठीमागून येऊन मिठी मारली आणि तिच्या डोक्याचा मागून मुका घेतला. महिलेने त्याला इंगा दाखवायला सुरु केल्यावर मात्र तो गडबडून गेला आणि त्याने महिलेचे पर्स घेऊन पलायन केले मात्र अखेर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा शोध लावत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
काय घडलंय नेमके ?
20 जानेवारीला रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला वकील अंधेरी स्टेशनसमोरील एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेली होती, तिथे आरोपी आधीच हजर होता. महिला वकिलाने एटीएममध्ये पैसे काढण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपीने महिलेच्या डोक्याचा मागून मुका घेतला. त्यानंतर महिला वकिलाने तिला थप्पड मारण्यासाठी मागे वळली तेव्हा आरोपी महिला वकिलाची पर्स पळून गेला. महिला त्याचा पाठलाग करत रस्त्यावर आली आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असताना तो त्या महिलेचा हात सोडवून पळून गेला.
सदर घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून एक महिला आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाल्याचं दिसून आलं आहे. अटक करण्यात आलेल्या माथेफिरु आरोपीचे नाव अविनाश अशोक कासार असून त्याचं वय 29 वर्षे आहे तर तो जॉब करतो अशीही माहिती समोर आलेली आहे. अंधेरीचे पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी याप्रकरणी माहिती दिली असून आरोपीने अशाच पद्धतीने आणखी किती लोकांना लुटलंय, याचा शोध सुरु आहे.