ठाण्यातील शाळेच्या ईमेलवर धमकीचा ई-मेल, मुंबईसाठी दिला इशारा

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना ठाणे शहर पोलीस हद्दीतील एका शाळेच्या अधिक्रुत ईमेलवर ई-मेल समोर आली. शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास लष्कर २९ नावाच्या धमकीचा ई-मेल शाळेच्या ई-मेल वर आला आणि त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली.

‘ मुंबई के स्कूल मे कॉलेज मे धमाके करेंगे.. कुर्बानी और धमाका ‘ असे दोनच मार्ग आपल्यापुढे समोर असल्याचे या ई-मेलमध्ये म्हटले होते. रविवारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पोलीस स्कूलमध्ये होणार होती त्यामुळे शाळेतील एक शिक्षिका शाळेची पाहणी करण्यासाठी आलेल्या असताना त्यांनी शाळेच्या ई-मेलवर काही आले आहे का हे पाहण्यासाठी लॅपटॉप उघडून ईमेल चेक करत असताना हा प्रकार उघडकीस आला.

ई-मेल मध्ये म्हटले होते की, ‘ मै जावेद खान लष्कर 29 का प्रमुख होने के नाते मेल भेज रहा हु. हिंदुस्तान मे जिहाद पालन करने मे सबसे बडा प्रॉब्लेम जहा कि एज्युकेशन सिस्टीम है यहाँ कि एज्युकेशन सिस्टीम बंद करके सिर्फ मदरसाद्वारा शिक्षा देणी चाहिये. तभी जिहाद के बारे मे पुरी जानकारी मिलेगी. हम मुंबई के स्कूल और कॉलेज मे धमाके करेंगे’ अशी धमकी दिली होती . पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.


Spread the love