पुण्यात खळबळ..मृतदेहाची केलेली अवस्था पाहून पोलिसही झाले हैराण

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना पुणे शहरानजीक पिंपरी इथे घडलेली आहे .पिंपरीत एका 29 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून अज्ञात मारेकऱ्यांनी संबंधित तरुणाच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार करत त्याचं डोकं ठेचलं आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली असता तरुणाची केलेली अवस्था पाहून पोलिसांना देखील धक्काच बसला.

पिंटू कुमार सहदेव शहा असं हत्या झालेल्या 29 वर्षीय तरुणाचं नाव असून सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मृत शहा याचा भोसरी येथील गुळवेवस्ती परिसरात मृतदेह आढळून आला आहे. येथील एका स्थानिक नागरिकानं हा मृतदेह पाहिला असता, त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटना धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.

मृत तरुणाच्या डाव्या डोळ्याजवळ दगडाने घाव घातले होते तर तोंडावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. सुरुवातीला तरुणाची ओळख पटत नव्हती. मात्र पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता मयत व्यक्ती पिन्टू शाह असल्याचं निष्पन्न झालं.