सोशल मीडियावर गुन्हेगार फसवण्यासाठी काय क्लुप्ती करतील याचा नेम राहिलेला नाही. आता तर चक्क बँकांचे कस्टमर केअर सेंटर म्हणून या भामट्यांनी गूगलवर सर्च केल्यानंतर येणारे नंबर यात देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला असून असाच एक अनुभव ठाणे येथे एका व्यक्तीला आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ग्राहकाने मोबाईल ॲपमध्ये अडचण असल्याकारणाने गुगलला बँकेचा कॉल सेंटर नंबर सर्च केला मात्र सर केलेला नंबर देखील बनावट होता आणि भामट्याच्या या नंबरवर सदर ग्राहकाने संपर्क केला असता समोरील व्यक्तीने देखील बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून सदर ग्राहकाला तब्बल साडेनऊ लाख रुपयांना गंडा घातला.
उपलब्ध माहितीनुसार, बदलापूर रमेशवाडी परिसरात राहणारे विक्रम सिंग येरी ( वय 53 ) यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे योनो ऐप ओपन होत नसल्याच्या कारणाने गुगलवर सर्च करून हा नंबर मिळवला होता मात्र संपर्क साधल्यानंतर समोरील व्यक्तीने विक्रम सिंग यांना ‘ एनी डेस्क ‘ नावाचे डाऊनलोड करायला सांगितले आणि त्यावर बँक ऑफ बँक आणि डेबिट कार्डची पूर्ण माहिती भरली. ( एनी डेस्क ॲप समोरील व्यक्तीला तुमचा मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरण्याचा किंवा लॅपटॉप वापरण्याचा पूर्णपणे अधिकार देते ज्यामध्ये आपल्या मोबाईलवर आलेले ओटीपी, ई-मेल पासवर्ड सर्व काही समोरील व्यक्ती पाहू शकतो )
याचाच फायदा घेत समोरील व्यक्तीने 24 तासात तुम्हाला पासवर्ड आणि यूजर आयडी चेंज झाल्याचा मेसेज येईल असे सांगत फोन कट केला आणि दुसऱ्या दिवशी विक्रम सिंग यांना तसा मेसेज देखील आला मात्र बँकेत खात्री करण्यासाठी ते गेले असता त्यांच्या खात्यातून नऊ लाख 53 हजार रुपये दुसरीकडे ट्रान्सफर झालेले पाहायला मिळाले .