एकीकडे पैसे कमवण्यासाठी नागरिक चक्क एकमेकांची फसवणूक करत करायला देखील मागेपुढे पाहत नाहीत असे असताना पुणे येथील उंड्री इथे प्रामाणिकपणाचा परिचय दिल्याची एक घटना उघडकीस आली असून सदर लॉन्ड्री चालक असलेल्या या व्यक्तीचे परिसरात कौतुक केले जात आहे .
उपलब्ध माहितीनुसार, उंड्री येथील शुभलक्ष्मी ड्रायक्लिनिंग व्यवसायिक नावाने व्यवसाय करणारे चालक राजमल कनोजिया ( वय 28 राहणार हांडेवाडी ) यांचा इस्त्रीचा व्यवसाय असून व्यंकटेश सोसायटीमध्ये राहणारे अशोक कनोजिया यांनी रविवारी शुभलक्ष्मी ड्रायक्लिनिंग इथे त्यांचे कपडे इस्त्री साठी दिले होते तर दुसरीकडे अशोक कनोजिया हे त्यांच्या घरातून गायब झालेले सोन्याचे दागिने शोधत शोधत हतबल झालेले होते.
दुसरीकडे शुभलक्ष्मी ड्रायक्लिनिंगचे चालक राजमल कनोजिया हे इस्त्री करत असताना त्यांना अचानकपणे अशोक कनोजिया यांच्या कोटाच्या खिशात काहीतरी वस्तू असल्याचे समजले आणि त्यांनी पाहिले असता त्यामध्ये चक्क सोन्याचे दागिने आढळून आले. सदर दागिन्यांची किंमत सुमारे सहा लाख रुपये होती मात्र राजमल कनोजिया यांनी कुठलाही मोहन बाळगता इस्त्रीसाठी कपडे आणलेल्या अशोक कनोजिया यांना भेटून प्रामाणिकपणे त्यांचे दागिने परत केले आहेत. राजमल कनोजिया यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरात मोठे कौतुक केले जात आहे.
राजमल कनोजिया यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, ‘ सहा लाख रुपयांचे दागिने घेऊन माझा संसार सुखाचा होणार नाही आणि मला त्याचे समाधान देखील मिळणार नाही. प्रामाणिकपणा ही आयुष्याची मोठी कमाई आहे. आपण मागील तीन वर्षांपासून लॉन्ड्री व्यवसाय करत असून परिसरातील सोसायटीतील अनेक नागरिक आपल्याकडे कपडे देऊन इस्त्री आणि ड्रायक्लिनिंग करून घेऊन जातात. आपण कष्टाचे पैसे कमवत असून आतापर्यंत कोणाच्याही पैशाला हात लावण्याचा आपल्याला कधीही मोह झाला नाही ‘.