देशात अनेक घटना अशा उघडकीस येतात की अल्प काळातच त्या मोठ्या चर्चेचे कारण ठरतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशात उघडकीस आली असून एका लग्न झालेल्या व्यक्तीचे बाहेर अफेअर सुरु असल्याचे त्याच्या मुलींना कळले आणि त्यांनी गाठत वडिलांच्या प्रेयसीची फुल्ल फ्री स्टाईल धुलाई केली. भिलवाडा जिल्ह्यातील जहाजपूर उपविभाग परिसरात हा थरार पाहायला मिळाला.
उपलब्ध माहितीनुसार, हनुमान नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेसोबत जात असताना दोन तरुणींनी वडिलांना रंगेहाथ पकडलं. दोन्ही मुलींनी संतापून वडिलांच्या कथित महिला मैत्रिणीला मारहाण केली. कुचवाडा रोडवर धावणाऱ्या दोन मुली अचानक एका कारसमोर उभ्या राहिल्या. कार पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी ती गाडी पुढे जाण्यापासून रोखली. सदर कथित प्रेयसीची धुलाई सुरु झाल्याचे पाहून थोड्याच वेळात परिसरात बघ्यांची गर्दी जमली आणि वेळ पाहून त्या कथित प्रेयसीने तेथून पळ काढला.
मुलींच्या म्हणण्यानुसार, त्यांचे वडील या कारमध्ये होते आणि सोबत जी महिला होती जी त्यांची मैत्रीण आहे. महिला आणि तिच्या वडिलांचे अफेअर सुरु असल्याने त्यांच्या घरात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलींनी महिलेलाही बाहेर काढून बेदम मारहाण केली मात्र आरोपी महिलेने संधी मिळताच तेथून पळ काढला.